Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
आफ्रिकन मोहगनी या जातीचे लाकूड अतिशय सुंदर दिसते. या कारणामुळे याच्या लाकडाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे व भाऊही चांगला मिळतो. या कारणामुळे आपण सर्व ठिकाणी आफ्रिकन मोहगनी लागवड करतो.
मोहगनी या झाडाची लागवड 10X10 किंवा 12X8 या अंतरावर केली जाते.
एका एकरामध्ये अंदाजे 444 मोहगणीच्या रोपांची लागवड होते.
मोहगनी या झाडाच्या बियांचा उपयोग मधुमेह, बीपी, टीबी, कॅन्सर यांच्या गोळ्या बनवण्यासाठी होतो .
या झाडाच्या लाकडाचा प्रमुख उपयोग जहाज बनवण्यासाठी केला जातो. या झाडाचे लाकूड वजनाने अतिशय हलके व मजबूत असल्यामुळे याचा उपयोग वाद्य निर्मिती साठी होतो. आत्ता बाजारामध्ये नवीन फॅशन आलेली आहे, वुडन फ्लोरिंग हे सर्व वुडन फ्लोरिंग ह्या झाडाच्या लाकडापासून बनविले जाते.
मोहोगणी हे झाड तुळशीच्या झाडाप्रमाणे वातावरणामध्ये 24 तास ऑक्सिजन सोडते म्हणून या झाडाला कार्बन क्रेडिट मिळते. कार्बन क्रेडिट म्हणजे वातावरणामध्ये ज्या गाड्या कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात तसेच कारखाने सुद्धा कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात व ते कमी करण्याचे काम हे झाड करते. म्हणून या झाडाला कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात अनुदान मिळते.
आंब्याच्या विविध उपयोगामुळे आणि गुणधर्मामुळे अनन्य साधारण महत्व. आंब्याचा उपयोग आंबा चटणी, सरबत, सिरप , व्हेनेगर, जाम यासाठी केला जातो.
आंबा या झाडाची लागवड 10X10 किंवा 20x20 या अंतरावर केली जाते.
एका एकरामध्ये अंदाजे 225 /444 आंबा रोपांची लागवड होते.
आंब्याचा गर काढून तो व्यवस्थित रित्या स्टोर करून बाहेरील देशात त्याची निर्यात केली जाते. त्यामुळे आंब्याला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मागणी आहे. आंब्याच्या वाढत्या मागणीमुळे व निर्यातीला असलेला वाव पाहता शेतकऱ्याला त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो.
केशर आंब्याचा पल्प हा बाहेरील देशात व भारतात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याच्यामुळे बाहेरील देशात तो एक्सपोर्ट केला जातो.
हे फळ औषधी गुणधर्म असल्याने त्याला बाजारात भरपूर मागणी आहे जांभळाचे फळ व्हिनेगर बनवण्यासाठी वापरतात तर परिपक्व फळापासून वाईन सरबत सिरप अनेक औषधे बनवले जातात
बहाडोली जांभूळ या झाडाची लागवड 10X10 किंवा 20x20 या अंतरावर केली जाते.
एका एकरामध्ये अंदाजे 225 /444 बहाडोली जांभूळ रोपांची लागवड होते.
या फळाच्या बियांपासून पावडर बनविता ती पावडर मधुमेह या आजारावरती मात करण्यासाठी वापरतात फळांचा रस हा डायरिया आजार या रोगावर मात करण्यासाठी उपयोगी आहे या फळापासून लोशन बनवले जाते ते फंगल इन्फेक्शन साठी वापरले जाते
या झाडाचे लाकूड पाणी कमी प्रमाणात शोषून घेते त्यामुळे रेल्वे ट्रॅक स्लीपर्स बनवण्यासाठी वापरतात
जांभळा मध्ये काही पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात त्यामुळे बाजारात त्याची भरपूर मागणी आहे
Copyright © 2024 skpsmahogany - All Rights Reserved.
SKPS MAHOGANY PVT LTD